Loading...

धनगर समाज विवाह चा उद्देश

सन्माननीय समाज बांधव जय मल्हार,... आजकाल विवाह जुळवणे ही समस्या होत चालली आहे. या करिता समाजाच्या विविध सामाजिक संघटना वधु-वर मेळावे आयोजीत करून हि समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. २१ व्या शतकात शिक्षणाची संधी वाढल्याने युवक-युवतींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सगळ्यांच्या अपेक्षाही वाढल्या असल्याने मनपसंत जावाई अथवा सून मिळविण्यासाठी व तसेच मुला-मुलींच्याही आपल्या जोडीदारा बाबत काही प्रश्न अथवा अपेक्षा असतात ती पूर्ण करण्यासाठी कधी वधु-वर अथवा त्यांचे पालक, नातेवाईकांची वधु-वर मेळाव्यांसाठी गर्दी होतांना दिसत आहे.
www.dhangarsamajvivah.com ( धनगर समाज विवाह ) हि वेबसाईट एक सामाजिक उपक्रम म्हणून उपवर वधु-वरांची माहिती या वेबसाईट वर प्रकाशित करून हा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा धनगर समाज विवाह चा प्रयत्न आहे.
वधु-वर मेळाव्याचे निमंत्रणे व माहिती सर्व समाज बांधावापर्यंत पोहचू शकत नाहीत. अनेक समाज बांधव अथवा वधु-वर काही वैयक्तिक अडचणीमुळे वधु-वर मेळाव्यास उपस्थिती राहु शकत नाही. त्यामुळे अनेक चांगली स्थळे संपर्कात येत नाही. वधुपित्याला किंवा वरपित्याला योग्य स्थळ शोधण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. भ्रमंती करावी लागते या मध्ये वेळेचा व पैशाचा फार मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. हा त्रास, वेळ व पैशाचा खर्च कमी करण्यासाठी सर्व वधु-वरांची माहिती एकाच ठिकाणी फार मोठ्या स्वरुपात "www.dhangarsamajvivah.com" या वेब साईटवर उपलब्ध करण्याचा उद्देश आहे.
www.dhangarsamajvivah.com या वेबसाईटच्या माध्यमातून होणाऱ्या वधु-वरांची नाव नोंदणी केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर रोजगारा निमित्त महाराष्ट्राबाहेर गेलेल्या समाजबांधावाला देखील वधु-वर संशोधनासाठी उपयोगी ठरून अनेक विवाहइच्छुकांचे ऋणानुबंध जुळले जातील व एक स्वास्थ व आनंदी धनगर समाजाची निर्मिती होईल यात शंका नाही.हे.

टीप :

आम्ही फक्त वधु-वर सुचक आहोत. मध्यस्ती, पसंती व व्यवहार यात 'धनगर समाज विवाह' चा कोणताही संबंध नसेल. तसेच स्थळाची वागणुक, नितीमत्ता, सत्यता, चारित्र्य इत्यादी व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित करण्या आधी करून घ्यावी. ती सर्व जबाबदारी सर्वस्वी सभासदाची अथवा पालकांची आहे.

Change language